Operation Sindoor मध्ये भारताने मारलेल्या पाच कुख्यात दहशतवाद्यांची नावं आली समोर

जम्मू काश्मीर: ७ मे रोजी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये खोलवर हवाई हल्ला केला तेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी गट, जश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे पाच दहशतवादी ठार मारले गेले होते. त्या पाच दहशतवाद्यांची नावं आता समोर आली आहेत.


भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले.  या एअर स्ट्राइकमध्ये ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, त्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने शासकीय अंत्यसंस्कार केले. अशा या पाच दहशतवाद्यांची नावं मुदस्सर खादियान खास, हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसूफ अझहर, खालिद उर्फ ​​अबू आकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी आहेत.


लष्करी गणवेशात या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या उच्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील दशकांपूर्वीचे संबंध यामुळे संपूर्ण जगासमोर उघड झाले होते.


भारताने पाकिस्तानच्या ध्वजात लपेटलेल्या दहशतवाद्याचा ताबूत दाखवणारा फोटो जगासमोर सादर करत, पाकिस्तान जागतिक दहशतवादात सहभागी असल्याचा निर्विवाद पुरावा सादर केला.



मुदस्सर खादियान खास


मुदस्सर आणि अबू जुंदाल या नावांनी ओळखला जाणारा खास हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. त्याच्याकडे भारताच्या सीमेपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या पाकिस्तानातील मुरीदके येथील मरकझ तैयबा या दहशतवादी छावणीचा प्रमुख होता. ही छावणी लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबने या छावणीत प्रशिक्षण घेतले होते. २६/११ मध्ये सहभागी असलेला आणखी एक दहशतवादी डेव्हिड हेडली यानेही येथे प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासचा अंत्यसंस्कार एका सरकारी शाळेत जागतिक दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ याच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, पाकिस्तानी लष्कराने खासला गार्ड ऑफ ऑनर दिला आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पहार अर्पण केला. त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करातील लेफ्टनंट जनरल आणि पंजाब प्रांताच्या पोलिस महानिरीक्षक पदावरील एक अधिकारी उपस्थित होता.



हाफिज मुहम्मद जमील


जमील हा जैश-ए-मोहम्मद हा जैशचा संस्थापक मसूद अझहरचा मेहुणा होता. पाकिस्तानच्या आत सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाहचा तो प्रमुख होता. बहावलपूर कॅम्पचा वापर नवीन भरती, दहशतवादी प्रशिक्षण आणि दहशतवाद बनण्यास प्रवृत्त करण्यासाठी केला जात होता.  ७ मे रोजी दहशतवादी कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातील किमान १० सदस्य आणि त्याचे चार सहकारी ठार झाले, ज्यामध्ये जमील देखील ठार झाला.



मोहम्मद युसूफ अझहर


मोहम्मद युसुफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी हा देखील जैशची संबंधित होता.  तो मसूद अझहरचा मेहुणा होता आणि त्याने जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचे काम पाहिले. त्याचे नाव जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आणि १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाच्या अपहरणामध्ये घेतले जाते. जे कंधार अपहरण म्हणून ओळखले जाते. असा हा मोठा दहशतवादी ऑपरेशन सिंदूर करवाईत ठार झाला.



अबू आकाश


अबू आकाश हा लष्करचा दहशतवादी होता, जो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. त्याने लष्कर-ए-तोयबासाठी अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फैसलाबादमध्ये त्याच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.



मोहम्मद हसन खान


जैश गटाचा मोहम्मद हसन खान  पीओकेमधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा मुलगा होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.


भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या पहिल्या हल्ल्यात या पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. पाकिस्तानने पाळलेल्या या दहशतवाद्यांना,  पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी धडक कारवाईद्वारे मारण्यात आले.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर