मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

मुंबई : प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि मेकअपद्वारे व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत अनेक चित्रपटांतील पात्रांना विक्रम गायकवाड यांनी मेकअपद्वारे जिवंत केले होते. विक्रम गायकवाड यांच्या पार्थिवावर शनिवार १० मे २०२५ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विक्रम गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.


अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात विक्रम गायकवाड यांनी मेकअपची कला आत्मसात केली. आधी शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनासाठी मेकअप करण्याचे काम करत विक्रम गायकवाड यांनी मेकअपच्या कामाचा सराव केला. स्वतः सातवीत शिकत असताना विक्रम गायकवाड यांनी शाळांतील मुलांना चिमणी, गाढव, मोर, पोपट असा मेकअप करुन दिला होता. पुण्यातल्या सगळ्या मुलींच्या शाळेत मेकअपसाठी गेल्याचे विक्रम गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानंतर एकांकिका, लोकनृत्य, संगीत नाटक स्पर्धांसाठी त्यांनी मेकअप करायला सुरुवात केली होती. दहावीत असताना सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मेकअप त्यांनी केले होते. आपल्यासमोर कोणी व्यक्ती नाही तर साक्षात देव आहे आणि त्याची पूजा आपण करत आहोत, या भावनेतून मेकअप केल्याचे विक्रम गायकवाड म्हणाले होते.


विक्रम गायकवाड यांच्या चित्रपटांमधील मेकअप करिअरची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील 'सरदार' या चित्रपटातून झाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी परेश रावलचा सरदार वल्लभभाई पटेल ही भूमिका साकारण्यासाठी मेकअप केला होता. 'मेकिंग ऑफ महात्मा', 'बालगंधर्व', 'संजू', कपिल देव यांच्यावरील '८३' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांचा मेकअप केला होता. मेकअप करुन व्यक्तीरेखा जिवंत केल्या होत्या.

Comments
Add Comment

Dipali Sayyad : ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चर्चेत; दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका, फर्स्ट लूक व्हायरल

Dipali Sayyad : राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या

Deool Band 2 Box Office Collection : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; १० कोटी चित्रपटाने कमवला ६०० टक्क्यांहून अधिक नफा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल

International Yoga Day : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी योग दिनी शेअर केले खास सीक्रेट

International Yoga Day :मुंबई : १२व्या आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day) दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक

Cocktail 2: 'कॉकटेल 2'ची बॉक्स ऑफिसवर दमदार झेप; दोन दिवसांत इतक्या कोटींचा टप्पा पार

Cocktail 2 : शाहिद कपूर (Shahid Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि कृती सनॉन (Kriti Sanon) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कॉकटेल 2' (Cocktail 2)

Rhea Kapoor : मेट गालासाठी गेली अन् धक्कादायक घडलं; सहार पोलिसांत गुन्हा दाखल

 मेकअप आर्टिस्टच्या हँडबॅगमधून कोट्यवधींचे दागिने गायब मुंबई: मुंबईतील सहार पोलीस (Sahaar Police Station) ठाण्यात 1.35 कोटी