India Pakistan War : मोठी बातमी : भारताचे आता मिशन DEAD सुरू; तर पाकिस्तानचा यू-टर्न : म्हणतो, 'आता शांती हवी!'

इस्लामाबाद : पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. भारताने केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको शांती हवी आहे, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे.



शांतता हवी आहे- इशाक दार


भारताने जर हल्ले थांबवले तर आम्हीसुद्धा हल्ले थांबवू. आम्हाला विनाश नको आहे, आम्हाला निधीचा अपव्यय नको. जर भारत थांबला तर आम्हीही थांबू. पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारता या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही. आम्हाला खरोखर शांतता हवी आहे, असे इशाक दार यांनी म्हटलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाक दार यांनी भारताविरोध वक्तव्य करुन वातावरण तापवले होते. मात्र, आता त्यांच इशाक दार यांनी, 'आम्हाला आता लढायचं नाही, भारत थांबला तर आम्ही थांबू', अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



 भारताने कारवाईचा गिअर बदलला


भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफांनी, क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मारा केला जात आहे. भारताने सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता भारत टप्प्याटप्प्याने ही मोहीम पुढे नेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला सैन्याने तेव्हा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रं नष्ट करुन भारताने या हल्ल्याला सरप्रेस केले. त्यानंतरही शु्क्रवारीही पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्याने फक्त 'सप्रेशन' स्ट्रॅटेजी न वापरता काऊंटर अटॅक केला. भारतीय सैन्याचे पहिले धोरण (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स) म्हणजे सीड असे होते. आता भारताने डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स (DEAD) धोरण वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या कालच्या हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करुन पाकिस्तानी सैन्याचे हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत.


पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला केला तेव्हा फक्त रक्षण करण्याचा पवित्रा होता. दुसऱ्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर आता पाकिस्तानने पुन्हा हल्लास केल्यास ऑपरेशन सिंदूर ३ अंतर्गत आणखी मोठा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.


Comments
Add Comment

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर