Helicopter service in Kedarnath Dham Closed: केदारनाथ धाममधील हेली सेवा बंद, सुरक्षेच्या कारणामुळे घेतला निर्णय

  122

उत्तराखंड:  भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जाणून घ्या किती काळ बंदी राहणार?


भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



३२ विमानतळ बंद, अनेक उड्डाणे रद्द 


नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की, उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ १५ मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. "भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एअरमेनना सूचना (NOTAMs) ची मालिका जारी केली आहे ज्यामध्ये ९ ते १४ मे २०२५ (१५ मे २०२५ रोजी ०५२९ IST पर्यंत) सर्व नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.


भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर" द्वारे दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने सीमा भागांवर केलेल्या गोळीबारामुळे, तसेच भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागातील शहरांवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांमुळे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला.



चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित 


भारत पाकिस्तान दरम्यानचा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आले आहे.  ज्यामध्ये केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवांचा देखील समावेश आहे, या सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद राहतील.


पुढील सूचना मिळेपर्यंत या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू-मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, पटहन, मुंद्रा, पटार, राजकोट, पट्टर, लुधियाना (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईसे, उत्तरलाई असे एकूण ३२ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या