भारताने १५ मेपर्यंत २४ एअरपोर्ट केले बंद, पाक तणावादरम्यान मोठा निर्णय

नवी दिल्ली: नागरी उड्डाण मंत्रालयाने भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान देशातील २४ एअरपोर्टवर देशांतर्गत येण्याजाण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आता १५ मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एअरपोर्टवर विमाने उड्डाण करणार नाहीत.


पंजाबचे अमृतसर, लुधिया, पटियाला, बठिंडा, हलवाडा, पठाणकोट हे एअरपोर्ट बंद राहतील. तर हिमाचल प्रदेशाचे भुंतर शिमला, कांगडा-गग्गल एअरपोर्ट बंद राहतील. केंद्रशासित प्रदेश चंदीगड एअरपोर्ट, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे श्रीनगर, जम्मू, लेह एअरपोर्ट, राजस्थानचे किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर एअरपोर्ट आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज एअरपोर्ट बंद राहतील.



एअरलाईन्सची प्रतिक्रिया


एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक एअरपोर्टसाठी आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाईट स्थिती जाणून घेण्यासाठी, पुन्हा बुक करण्यासाठी अथवा रिफंडसाठी लिंक शेअर केल्या आहेत. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ