Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट


मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून (९ मे) बस भाड्यात वाढ जाहीर केली आहे. बेस्टने यापूर्वीच लवकरच बस भाडे वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात, महापालिका प्रमुख भूषण गगराणी यांनी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार आजपासून बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडे सुधारणेनुसार, जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.



बेस्ट बसचे सुधारित भाडे किती?


मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (MMRTA) मंजूर केलेल्या भाडे सुधारणेनुसार, नॉन-एसी बससाठी किमान बस भाडे १० रुपये आणि एसी बससाठी १२ रुपये असेल. यापूर्वी नॉन-एसी बससाठी ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये असे भाडे होते. ज्यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.



नॉन एसी बससाठी शुल्क


आजपासून लागू झालेल्या नवीन रचनेनुसार, नॉन-एसी बसेसच्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १०, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५ आणि ६० रुपये शुल्क आकारावे लागेल.



एसी बससाठी शुल्क


एसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १२, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० आणि ६५ रुपये शुल्क आकारावे लागेल. ५० किमी अंतराच्या पलीकडे, प्रत्येक अतिरिक्त ५ किमीसाठी ५ रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाईल.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती