भारत - पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील २४ विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद केले आहे. या विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद आहे. तसेच भारत सरकारने दिल्ली, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.


पाकिस्तानने भारतातील सैन्य आस्थापने आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन हल्ले केले. पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले भारताने परतवले. पाकिस्तानने सीमेजवळच्या गावांना तसेच सीमेवरील सुरक्षा पथकांच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि जड तोफांचा मारा केला. या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील सैन्य आस्थापनांवर हल्ले केले आहेत. तसेच भारताने कराची बंदरालाही लक्ष्य केले आहे.


भारतात प्रामुख्याने उत्तर आणि पश्चिम भागातील नागरी विमान वाहतूक बंद आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब येथे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू असल्यामुळे नागरी विमान वाहतुकीवर सध्या प्रतिकूल परिणाम झाला आहे. नागरिकांना विमानाच्या नियोजीत वेळेच्या किमान सव्वा ते दीड तास आधी विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन नागरी विमान वाहतूक कंपन्यांनी केले आहे.


भारत - पाकिस्तान लढाई


पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला केला आणि २५ भारतीय तसेच एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. यानंतर भारताने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई केली. पण अतिरेक्यांचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानचा संताप झाला. त्यांनी लगेच ७ मे रोजी रात्री आणि ८ मे रोजी मध्यरात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील निवडक शहरांवर मोजक्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. ही कारवाई कमालीची यशस्वी झाली. ड्रोन हल्ल्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी रात्रीपासूनच भारतावर हल्ले करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने नागरी वस्ती आणि सैन्याची आस्थापने या दोन्हीला लक्ष्य करुन हवाई हल्ले सुरू केले. तसेच सीमेवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने प्रचंड वेगाने आणि अतिशय प्रभावी उत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना आकाशातच नष्ट केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र हल्ले केले. पाकिस्तानच्या सर्व विमानतळांना आणि सैन्याच्या आस्थापनांना लक्ष्य करुन हल्ले करायला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन, लहान - मोठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, अॅवॅक्स रडार नष्ट केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या कराची बंदरात आणि अनेक विमानतळांवर सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही परिस्थिती सकाळ उजाडली तरी कायम आहे.

Comments
Add Comment

एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा

मद्यप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री, बिअर आणि दारुच्या किमती वाढणार?

मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा