रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी!


कराची : पाकिस्तानातून आलेल्या मोठ्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमजवळ आज भारतीय ड्रोनने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज रात्री ८ वाजता पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामना याच मैदानावर होणार होता. मात्र, हल्ल्यानंतर वातावरण तापले असून सामना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.


पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ड्रोन स्टेडियमजवळील झाडावर आदळला, त्यामुळे परिसरातील दुकानांच्या काचा फुटल्या आणि एक नागरिक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षा यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.



या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि सरकार यांच्यात तातडीने उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली आहे. एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने दिलेल्या माहितीनुसार, अनेक परदेशी खेळाडू हा हल्ला अनुभवून धास्तावले आहेत आणि त्यांनी शक्य तितक्या लवकर पाकिस्तानमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. "आता पुढील सामन्यांचे काय, हे सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मिळून ठरवणार आहेत," असेही त्याने स्पष्ट केले.


दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी यापूर्वीच असा दावा केला होता की लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची आणि रावळपिंडी येथे परदेशी ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. त्यामुळे हा हल्ला आधीच शंका-संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो.





या हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. क्रिकेटसारख्या 'जेम्स बॉन्ड सुरक्षा' दिलेल्या कार्यक्रमातच जर ड्रोन घुसू शकतो, तर मग सामान्य नागरिकांचं काय? हा हल्ला केवळ एक इशारा आहे की भारताकडे आता तंत्रज्ञानाचं प्रचंड बळ आहे आणि गरज पडल्यास ते कोणत्याही पातळीवर शत्रूला भिडू शकतो. त्यामुळेच सध्या पाकिस्तान सरकार, लष्कर आणि PCB तीनही पातळ्यांवर घबराटीचं वातावरण आहे. देशात परदेशी खेळाडू सुरक्षित आहेत का? हे प्रश्नही उभे राहत आहेत. एकीकडे भारत शांतपणे बॉर्डरपलीकडून आपला संदेश देतोय, आणि दुसरीकडे पाकिस्तानला आपली अब्रू झाकण्यासाठी पळता भूई थोडी झाली आहे.

Comments
Add Comment

भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक दावोस : “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

अमेरिकेत घडत आहेत धक्कादायक घडामोडी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार

‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ

ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि

ट्रम्प वाढवताहेत जागतिक अस्वस्थता

अमेरिकेचे विक्षिप्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील, कौतुक करता करता कधी पायाखाली घेतील, याचा