फिटला संदेहो निमाले दुजेपण

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे सुंदर वर्णन केलेले आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

परमेश्वराचे जे पाहता येण्यासारखे रूप आहे ते त्यांनी डोळे भरून पाहिले पण परमेश्वर जसा आहे तसा कुणालाच पाहता येणार नाही, कुणी पाहिलेला नाही व यापुढे पाहता येणार नाही. मी समुद्राचे नेहमी उदाहरण देतो. समुद्र जसा आहे तसा आपल्याला पाहता येत नाही, पण समुद्र वरवर आपण पाहू शकतो. समुद्राच्या काठावर आपण बसलो की आपल्याला त्या किनाऱ्यापासून क्षितिजापर्यंत समुद्र आपल्याला पाहता येतो व आपण म्हणतो हा समुद्र पण समुद्र तेवढाच असतो का? दिसतो तो समुद्र व असतो तो समुद्र यात जमीन अासमानाइतके अंतर आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

 तो श्रीहरी आम्ही पाहिला, पण कसा पाहिला? समुद्र आपण पाहतो तसा पाहिला. त्याचे परिमित रूप जे आहे ते
आम्ही पाहिले.

अनंत रूपे अनंत
वेषे देखिले म्या त्यासी


बाप रखुमादेवीवरू
खूण बाणली ऐसी


देखिला देखिला
माये देवाचा देवो


फिटला संदेहो निमाले दुजेपण अनंत रुपांनी आपण त्याला पाहतोच आहोत, विश्वरूपाने तोच आहे, जगरूपाने तोच आहे, असंख्य जीवजंतूंच्या रूपाने तोच आहे. सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर सतत विस्तारीत आहे. “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत जो शब्द वापरलेला आहे तो किती वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. वैज्ञानिक जो शब्द आता वापरतात तोच ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. वैज्ञानिक काय सांगतात? जग हे विस्तारत विस्तारत जाते. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’. विस्तार हा शब्द महत्त्वाचा आहे. माणसाचा जो विस्तार होतो ना त्यालाच संसार म्हणतात. एका व्यक्तीचा विस्तार होतो तोच संसार. हा वाईट आहे की चांगला? चांगला आहे. बायको, मुले, नातवंडे, पतवंडे असणे हे ऐश्वर्य आहे
Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन