Operation Sindoor PC : ''भारतावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता, म्हणून चोख प्रत्युत्तर द्यावं लागलं"

  109

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २२ एप्रिलला २६ निष्पापांचा बळी गेला होता. भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. मात्र, दहशतवाद्यांना कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना निर्घृणरित्या मारणाऱ्या दहशतावाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले केले. त्यामध्ये ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर सेनेकडून महत्वाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली.


भारतावर आत्तापर्यंत झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओने पीसीची सुरुवात झाली. त्यात पहलगाममधील हल्ला देखील दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते. गेल्या दशकभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३५० भारतीयांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाल्याचे व्हिडीओत नमूद करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती इनपूटद्वारे आम्हाला मिळाली होती, अशी अत्यंत महत्वाची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.



२२ एप्रिल हल्ल्याच्या मास्टरमाइंडला धडा शिकवायचा होता


विक्रम मिस्री यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थितांना 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल संपूर्ण माहिती दिली. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला क्रूर होता, दहशतवाद्यांनी अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या झाडल्या. एका समूहाने टीआरएफने जबाबदारी घेतली आहे. ही संघटना तोयबाशी संबंधित असल्याचे नमूद केले. या हल्ल्यानंतर भारतात आक्रोश होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध तोडले, काही निर्णय घेतले. त्यानंतर २२ एप्रिल हल्ल्याच्या मास्टरमाइंडला धडा शिकवण्याचं ठरवलं.





"गेले ३ दशक पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय"


पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाकडून 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेतले. यात ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. गेल्या ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय - कर्नल सोफिया कुरेशी



भारतावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता


मात्र पहलागममधील निर्घृण हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारताच्या विरोधात हल्ले होतील हे आम्हाला इनपूटद्वारे कळलं होतं. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुपित माहिती मिळाली होती. त्यामुळे हे रोखणं आवश्यक होतं. त्यामुळे आज मध्यरात्री भारताने त्याला चोख उत्तर दिलं आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती. भारतात अतिरेकी पाठवण्यावर रोख लागण्यासाठी ही कारवाई होती, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.