शिर्डीत ३.७५ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त; शहरात खळबळ

  46

शिर्डी : प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत अवैध गुटख्याचा साठा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त कारवाईत तब्बल ३,७५,००० किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गणेशवाडी परिसरातील आनंद निवास या ठिकाणी करण्यात आली.


?si=akom3h0WuXUHP445

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद निवास येथे धाड टाकली असता, एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि संबंधित साहित्य आढळून आला. या साठ्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या पॅकेट्सचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ३.७५ लाखांवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे.



गुटखा विक्री आणि साठवणूक महाराष्ट्रात पूर्णतः बंद असूनही, इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी गुटखा साठवण्यात आल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शिर्डी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष पंचनामा केला.


या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात अन्न सुरक्षा कायदा आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुटख्याचा साठा कुठून आला आणि तो कुणासाठी ठेवण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.


शहरातील श्रद्धाळूंच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळणं ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल