मिठी प्रकल्पात ६५ कोटींचा अपहार; बीएमसीचे ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

१००० कोटींचा संशयित घोटाळा


मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठा घोटाळा उघड झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.


या आरोपींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला तब्बल ६५.५४ कोटींचा आर्थिक फटका दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एकूण घोटाळा १००० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.


आज सकाळपासून विशेष तपास पथकाने मुंबईतील ८–९ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे घर व कार्यालये तपासली जात आहेत. विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासावर आधारित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



या कारवाईत कै. काशिवाल (कैलाश कन्स्ट्रक्शन), ऋषभ जैन (अक्युट एन्टरप्रायझेस), आणि शेरसिंह (मंदीप एन्टरप्रायझेस) या तीन ठेकेदारांना समन्स बजावण्यात आले आहेत.


२००५ पासून सुरू असलेल्या १७.८ किमी लांब मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पावर १३०० कोटी खर्च करण्यात आले. या पैशांचा उपयोग खरोखर झाला का, की तो खोट्या करारपत्रांच्या आधारे अपहार केला गेला, हे तपासण्यात येत आहे.


आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त व्ही. डी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई