Virat Kohli: चेन्नई विरुद्ध सामन्यात विराट कोहली एक किंवा दोन नव्हे, तर ५ वेगवेगळे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर

बंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध सीएसके (RCB Vs CSK) अशी लढत रंगणार आहे.  आयपीएलच्या (IPL 2025) या सामन्यात साऱ्यांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) च्या विराट खेळीकडे असणार आहेत.  कारण या सामन्यात विराट कोहलीला एक किंवा दोन नव्हे तर तब्बल ५ वेगवेगळे विक्रम मोडण्याची संधी आहे.


विराट कोहली शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाकडून आयपीएल २०२५ मध्ये अव्वल स्थान आणि प्लेऑफ पात्रता मिळवण्याच्या ध्येयाने मैदानात उतरेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध होणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात आरसीबीने पहिल्या हंगामानंतर पहिल्यांदाच चेपॉक येथे सीएसकेचा पराभव केला आहे. त्या सामन्यात आरसीबीने ५० धावांनी सीएसके विरुद्ध विजय मिळवला होता.


आरसीबी १० सामन्यांत १४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, नेट रन-रेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या मागे आहे. या हंगामात आरसीबीतून खेळत असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत कमाल कामगिरी करून दाखवली आहे.



आयपीएल २०२५ मधील विराटची खेळी


या हंगामात विराट कोहलीने आतापर्यंत ४४७ धावा केल्या असून, तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच सीएसकेविरुद्ध सामन्यात कोहलीला एक किंवा दोन नव्हे तर पाच वेगवेगळे विक्रम मोडण्याची संधी असेल.



CSK विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली मोडू शकणाऱ्या विक्रमांची यादी



  • ८५००: आयपीएलमध्ये विराट कोहली ८५०० धावांपासून अवघा ५३ धावा दूर आहे.

  • ९५००: टी२० मध्ये विराट कोहली ९५०० धावांपासून १० धावा दूर आहे.

  • ७५०: आयपीएलमध्ये ७५० चौकारांच्या विक्रमासाठी विराट कोहली फक्त ६ चौकारने दूर आहे.

  • ३००: आरसीबीसाठी ३०० षटकारांमधून विराट कोहली १ षटकार दूर आहे.

  • ५०: आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध ५० षटकारसाठी विराट कोहलीचे ७ षटकार बाकी आहे.


आरसीबीचा शेवटचा सामना २०२४ च्या आयपीएलमध्ये बेंगळुरूमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाला होता, त्या सामन्यांत आरसीबीने २७ धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.



RCB विरुद्ध CSK सामन्यात पावसाचे सावट


शनिवारी होत असलेल्या RCB विरुद्ध CSK सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. गेल्या दोन दिवसांपासून, बेंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे आणि सामन्याच्या दिवशीही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, "दुपार किंवा संध्याकाळी विजेच्या गडगटांसह पाऊस पडण्याची शक्यता असेल." असे असले तरी दोन्ही संघ सामन्याचा जोरदार सराव करत असून, क्रीडाप्रेक्षक देखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'