शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस तपास सुरू

शिर्डी : शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने ई मेल करुन ही धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

शिर्डीच्या साईबाबांचे जगभर लाखो भक्त आहेत. हे भक्त शिर्डीत साई संस्थान मंदिरात येऊन साईबाबांना पाया पडणे पसंत करतात. दररोज शिर्डीच्या साई संस्थान मंदिरात भाविकांची रिघ लागलेली असते. महत्त्वाच्या दिवशी साईचरणी लीन होण्यासाठी लाखो भक्त येतात. यामुळे मंदिरासाठी कायमस्वरुपी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. शिफ्ट ड्युटी स्वरुपात २४ तास आठवड्याचे सातही दिवस मंदिराचे संरक्षण केले जाते. पण धमकीला ई मेल आल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा ताफा आणि शिर्डी पोलीस यांच्या कामात वाढ झाली आहे.

इ मेल नेमका कोणी केला याचा तपास सुरू आहे. मंदिराच्या बंदोबस्ताचा अधिकाऱ्यांनी नव्याने आढावा घेतला आणि तो आणखी चोख केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस इ मेल नेमका कोणी केला याचा शोध घेत आहेत. संपूर्ण मंदिरात तसेच मंदिराबाहेर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास सुरक्षा रक्षक लगेच घटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग