... म्हणून फुटले ७० हजाराचे हेल्मेट, अपघाताच्या धक्कादायक फुटेजने सर्वकाही झाले उघड

कोल्हापूर: कोल्हापूरचे प्रसिद्ध बिल्डर विलास रेडेकर यांचा २३ वर्षीय मुलगा सिद्धेश रेडेकर (Kolhapur Bike Rider Accident) याचा दिनांक २० एप्रिल रोजी आजरा-आंबोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. तब्बल 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती 70 हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असताना सुद्धा त्याला जीव गमवावा लागला. ज्याचे फुटेज आता समोर आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघाताचे संभाव्य कारण बाईकची वेगवान गती असल्याचे दिसून आले आहे. सिद्धेशच्या हेल्मेटमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्याने टिपलेले फुटेज हे या घटनेचे भीषण वास्तव मांडते. या फुटेजमध्ये, सिद्धेश जीवघेणा अपघात होण्यापूर्वी दोनदा हँडलबार सोडताना दिसतो, तरी देखील सिद्धेशच्या बाईकचा वेग काही कमी झाला नाही.

अपघातापूर्वी काय झाले? कॅमेऱ्यात झाले कैद


या भयानक फुटेजमध्ये अपघातापूर्वीच्या क्षणांबद्दल महत्त्वपूर्ण तपशील हाती आला आहे. या हेल्मेट कॅमेऱ्यामधील व्हिडिओ फुटेज आता व्हायरल झाले असून अपघात कसा झालाय हे यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. अपघातापूर्वी त्याच्या दुचाकीची गती प्रतितास १४२ किलोमीटर होती.

 



दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गाडीचा वेगच मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. या अपघातामध्ये बारा लाखांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. हेल्मेट सुद्धा फुटलं होतं.

कसा झाला अपघात?


सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच त्याला दूरवर प्रवास करण्याची सवय होती. त्याप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर आपल्याचार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते. दरम्यन आंबोली घाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्यांनतर सकाळी 11 वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली.

70 हजाराच्या हेल्मेटचे झाले तुकडे


या अपघातामध्ये सिद्धेशच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले, या अपघातामध्ये त्याच्या छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध