GT vs SRH, IPL 2025: गुजरातचा हैदराबादवर ३८ धावांनी विजय

  106

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५१व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर ३८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरातने हैदराबादला विजयासाठी २२५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला या सामन्यात केवळ १८६ धावाच करता आल्या. गुजरातने हा सामना ३८ धावांनी जिंकला.


पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातची सुरूवात जबरदस्त राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पावरप्लेमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये ४१ बॉलमध्ये ८७ धावांची भागीदारी केली. स्पिनर जीशान अन्सारीने साई सुदर्शनला बाद करत ही भागीदारी तोडली. सुदर्शनने ९ चौकारांच्या मदतीने २३ बॉलमध्ये ४८ धावा ठोकल्या. सुदर्शन बाद झाल्यानंतर शुभमनने २५ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.


शुभमन गिल हळू हळू शतकाच्या दिशेने जात होता. मात्र दुर्देवाने हर्षल पटेलच्या थ्रोवर तो रनआऊट झाला. शुभमनने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ बॉलवर ७६ धावा ठोकल्या. शुभमन आणि जोस बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी झाली. शुभमन बाद झाल्यानंतर बटलरने वॉशिंग्टन सुंदरसोबत मोर्चा सांभाळला. त्याने ३१ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

Comments
Add Comment

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप

आशिया कप २०२५ पूर्वी बीसीसीआयमध्ये मोठे बदल, राजीव शुक्ला बनले हंगामी अध्यक्ष

मुंबई : एशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे,त्याला सुरू होण्यास आता दोन

Lionel Messi: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत... ४ सप्टेंबर रोजी खेळणार शेवटचा घरगुती सामना!

बुएनोस आइरेस: फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीने निवृत्तीचे संकेत देत, जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का

Diamond League 2025 Final : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर, ज्यूलियन वेबरने जिंकले विजेतेपद

झुरिच: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ च्या अंतिम

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर