'छावा' फेम अभिनेत्याच्या घरी लवकर हलणार पाळणा, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

८०० कोटींच्या 'छावा' चित्रपटाचा हा अभिनेता होणार बाबा, लग्नाच्या ३ वर्षांनी हलणार पाळणा


'छावा' फेम अभिनेता विनीत कुमार सिंहच्या (Vineet Kumar Singh) घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. विनीतची पत्नी रुचिरा गरोदर असून जुलै महिन्यात बाळाचा जन्म होणार आहे.


'छावा' हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ज्यात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची दमदार भूमिका साकारली आहे, मात्र त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता विनीत कुमार सिंगच्या 'कवी कलश' ने देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आधी 'छावा' आणि नंतर सनी देओलच्या जाटमध्ये दिसल्यानंतर, आता विनीत कुमार सिंहकडे आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.


विनीतने इंस्टाग्राम पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करत, ज्यामध्ये लिहिले, "नवीन जीवन आणि आशीर्वाद! या विश्वाकडून, खूप सारे प्रेम घेऊन... लवकरच बाळ येत आहे!! नमस्ते लिटिल वन, आम्ही तुझे स्वागत करण्यास तयार आहोत."


बाबा होण्यासाठी उत्सुक


पत्नी रुचिरा हिच्या गरोदरपणाची बातमी शेअर करताना विनित कुमार सांगतो, "आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमचे मूल या जगात येण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही. आमच्यासाठी हा अनुभव नवा आहे. आणि मी प्रत्येक क्षणांसाठी तिथेच राहू इच्छितो."
Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट