पैज जिंकण्यासाठी दारू पिणे भोवले, तरुणाचा मृत्यू

बंगळुरू : मित्रांमध्ये जास्तीत जास्त दारू पिण्याची पैज लागली. ही पैज जिंकण्यासाठी पाणी, सोडा किंवा कोल्डड्रिंक न मिसळता थेट बाटली तोंडाला लावून दारू प्यायची होती. जो या पद्धतीने जास्तीत जास्त दारू पिऊ शकेल तो दहा हजार रुपये जिंकेल, असे ठरले. पैजेसाठी सर्व मित्रांनी पैसे लावले. पैज जिंकण्याकरिता एका तरुणाने एकदम पाच बाटल्या दारू खरेदी केली. तरुण एकामागून एक बाटल्या रित्या करत गेला. थोड्या वेळात भरमसाठ दारू प्यायल्यामुळे तब्येत बिघडली आणि तरुणाचा मृत्यू झाला. भरमसाठ दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेला तरुण २१ वर्षांचा होता. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि आठच दिवसांपूर्वी तो मुलीचा बाप झाला होता.



दारूच्या नादात जीव गमावणारा तरुण कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे नाव कार्तिक असे होते. वेंकट रेड्डी, सुब्रह्मण्यम आणि इतर तीन जणांसोबत दारू पिण्यासाठी पैज लावली होती. पैज जिंकल्यास कार्तिकला दहा हजार रुपये मिळणार होते.



पैशांसाठी कार्तिकने दारुच्या पाच बाटल्या खरेदी केल्या आणि एकामागून एक रित्या करत गेला. एवढी दारू एकदम पोटात गेल्यामुळे कार्तिकची तब्येत बिघडली आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. मित्रंनी कार्तिकला तब्येत बिघडताच मुलबागल येथील रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत वेंकट रेड्डी आणि सुब्रह्मण्यम यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे २६ लाख नागरिकांचा दारू प्यायल्यामुळे मृत्यू होतो. जगभरात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारू पिण्यामुळेच होतात.
Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष