६५ वर्षांनंतर महाराष्ट्र कुठे उभा आहे?

महाराष्ट्र दिन: इतिहास, वास्तव आणि उद्याची दिशा


आज १ मे – महाराष्ट्र दिन! ६५ वर्षांपूर्वी, १९६० साली, असंख्य आंदोलनं, बलिदान आणि लोकशक्तीच्या जोरावर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राच्या भूमीला स्वतंत्र अस्तित्व मिळालं. पण… आज ६५ वर्षांनंतर प्रश्न पडतोय – आपण कुठे आहोत?


ही तीच भूमी जिथे ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा दीप लावला… तुकारामांनी भक्तीची वाट दाखवली… शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं… आणि फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे यांनी सामाजिक समतेचा पाया रचला.



संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एक स्पष्ट दिशा दिली – कृषी-औद्योगिक समन्वय, आणि शेतकरी-कामगार-सरकारी नोकर वर्गाचा विकास. परंतु नंतर काय झालं? साठ, सत्तरीच्या दशकानंतर शेती कोलमडली… औद्योगिक वाढ थांबली… सेवा क्षेत्राने उचल घेतली, पण समाजात एक नवी तफावत निर्माण झाली – शहरं श्रीमंत, ग्रामीण भाग उपेक्षित!


मुंबई-पुणे-नाशिकचा विकासाचा त्रिकोण तयार झाला… पण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण हे त्रासदायक वास्तवात अडकले.


समाजरचना बदलली.. पूर्वी शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग होता. आता नव-सरंजामदार, नव-भांडवलदार आणि उच्चभ्रू वर्ग पुढे आलाय.


मोबाईल, इंटरनेट आणि AI – या तीन गोष्टींवर आज महाराष्ट्राचं नियंत्रण आहे. पण कायदा-सुव्यवस्था ढासळलीय, शिक्षणाची गुणवत्ता घसरलीय, पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय… विद्यापीठांचा दर्जा घसरलाय… जिथून देशाला नाटक, चित्रपट, साहित्य मिळालं, त्याच महाराष्ट्रात आज कलावंत उपेक्षित आहेत. समाजातील विचारशीलता मावळत चाललीय…


आजच्या महाराष्ट्राला गरज आहे नवीन सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनाची. समतेवर, न्यायावर आधारित तंत्रज्ञानयुक्त, सर्वसमावेशक विकासाची. महाराष्ट्राला गरज आहे एका दूरदर्शी कार्यक्रमाची. भविष्यामध्ये कोणत्या दिशेने जायचे, कसे जायचे याचा पक्का कृती कार्यक्रम आखून, त्या दिशेने वाटचाल करण्याची. वेळ अजूनही गेलेली नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन हे करणं शक्य आहे. तितका समंजसपणा अजूनही महाराष्ट्रात नक्की आहे. मराठी मनगटांमध्ये तितकी ताकद अजूनही आहे. गरज आहे दिशा देण्याची. इतिहासाच्या केवळ गप्पा मारुन उपयोग नाही… त्यातून शिकून, उभं राहायचं असतं! इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते, त्यातील चुकांमधून काही तरी शिकायचं असतं... हे ओळखलं नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.


आज राज्य स्थापना दिवस... तर "आता तरी जागं व्हायचं का?" असा आत्मपरीक्षणाचा हा क्षण आहे.

Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी सूचवले आहेत. आजचे टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा