Udaykumar Shiroorkar : प्रॉब्लेम असतातच, सोल्यूशन शोधा

  524

‘आता थांबायचं नाय’चे ‘रियल हिरो’ दै. प्रहार कार्यालयात


मुंबई : आय अ‍ॅम ऑलवेज विनर, मी कधीही पराभूत झालो नाही. याचं कारण प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्यूशन असते, ते शोधा असे स्पष्ट मत मुंबई महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी व्यक्त केले. 'आता थांबायचं नाय'चे (Ata Thambaycha Nay) 'रियल हिरो' उदय शिरुरकर (Udaykumar Shiroorkar) यांनी दै. प्रहार कार्यालयाला (Prahaar NewsLine) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.



१ मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिनासोबत (Maharashtra Day) 'कामगार दिन' (Labour Day) साजरा केला जातो. या कामगार दिनाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेचे सिंघम म्हणून ओळख असलेले 'उदयकुमार शिरुरकर' (Udaykumar Shiroorkar) यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच अानुषंगाने दै. प्रहारच्या कार्यालयात उदयकुमार शिरुरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, लेखा आणि प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उदयकुमार शिरुरकर यांना शाल आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याशी एकूणच चित्रपट आणि त्यांच्या कार्याशी संबंधित विषयांवर गप्पांच्या ओघात चित्रपटाविषयीची मूळ कथा जाणून घेण्यात आली. यावेळी संपादकीय आणि वेब विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.



या संवादादरम्यान मूळचे बेळगावातील एक तरुण मुंबईच्या प्रेमापोटी कसा मुंबई शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झाला, हे सांगताना, शिरुरकर यांनी त्यांच्या जीवनातील मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनेक प्रसंग ऐकविले. त्यातून आणखी एखादा चित्रपट तयार होईल, असा खजाना त्यांच्यापाशी असल्याचे दिसले. 'आता थांबायचं नाय' (Ata Thambaycha Nay) या चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. या चित्रपटाची कथा एका सत्यकथेवर आधारित असून, एक प्रेरणादायक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. ''जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून थांबण्याऐवजी अधिक मेहनत आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे'' असा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये २०१६ मध्ये घडलेल्या एका घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचली आहे. तसेच मराठी शाळा वाचवण्यासाठी काही कारणास्तव दहावी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांनी दहावीच्या परीक्षेला बसावे, असा फतवा काढून कर्मचाऱ्यांनी रात्रशाळेत शिकून दहावीची परीक्षा द्यावी असा उदयकुमार शिरुरकर (Udaykumar Shiroorkar) यांनी आग्रह केला. दिवसभर राबणाऱ्या, घाणीने माखलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात अभ्यासाची पुस्तकं देण्याच्या सामाजिक 'धाडसा'ची गोष्ट जगासमोर आणण्यासाठी झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भूतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार आहेत. शिवराज वायचळ दिग्दर्शित, उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले असून शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटात उदयकुमार शिरूरकर यांची भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट