बेशरम पाकिस्तान : पाकिस्तानला आपल्या लोकांचीही पर्वा नाही!

स्वदेशी परतण्यासाठी पाकड्यांची तळमळ; अटारी बॉर्डर सकाळपासून बंद


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत, देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयानंतर पाकिस्तानचा असंवेदनशील आणि बेशरम चेहरा पुन्हा समोर आला आहे.


आज सकाळपासून शेकडो पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवर अडकले असून, पाकिस्तानने अद्याप गेट उघडलेले नाहीत. यावरून पाकिस्तान आपल्या नागरिकांनाही परत घेण्यास तयार नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.


पाकिस्तान सरकारची ही भूमिका माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आपल्या देशातील नागरिक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे सोडून, पाकिस्तान शांत राहून त्यांची हेळसांड करत आहे. हेच पाकिस्तानचे खरे स्वरूप दर्शवते. देश चालवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारला ना मानवतेची जाणीव आहे ना आंतरराष्ट्रीय नीतीचे भान.


पहलगाममध्ये जे काही घडले, ते अपघात नव्हता. तो पाकिस्तान पुरस्कृत हल्ला होता. अशा भ्याड कारवायांमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो दहशतवाद्यांचा सुरक्षित आसरा आहे. आता तर हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधातच नाही, तर आपल्या नागरिकांच्याही विरोधात आहे.


पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवर सकाळपासून गेट उघडण्यात आलेले नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांना देखील परत घेण्यास तयार नाही आणि भारतीय नागरिकांना देखील भारतात परत येण्याची अनुमती दिली जात नाही, त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारतीय इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी पाकिस्तानकडून गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. अटारी सीमेवर सकाळपासून आलेले पाकिस्तानी नागरिक वाहनांमध्ये पाकिस्तानच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफकडून दस्तऐवजांची तपासणी होईल आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर इमिग्रेशन तपासणी होऊन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकतील. सकाळपासून एकाही पाकिस्तानी नागरिकाने अद्याप सीमारेषा ओलांडलेली नाही.


दरम्यान, मोदी सरकार पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी लोकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत राष्ट्रीय सुरक्षेचा निर्णय घेतला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानने आपली लाचारी आणि अमानवी वृत्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर

Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी