Pakistani Celebrities: भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड

पाक कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट भारतात बॅन, माहिरा खान, अली जाफर सारख्या अनेक कलाकारांना बंदी


मुंबई: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानची सर्वच सगळ्या बाजूने कोंडी करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये राजनैतिक, आर्थिक तसेच काही युट्युब चॅनलला बॅन करण्याबरोबरच, पाकिस्तानच्या मनोरंजनसृष्टीला देखील जबरदस्त दणका देण्यात आला आहे. कारण, आता पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावरील अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये माहिरा खान, अली जफर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.


पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नो एंट्री ची कारवाई याआधीच केली असून, पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेल्या सिनेमांचा भारतीय प्रेक्षक जोरदार विरोध करताना दिसून येत आहे. अभिनेता फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा हिंदी सिनेमा रिलीज होणार होता, त्यावर देखील बंदी घातली गेली. या सिनेमातील गाणी देखील युट्युबवरून काढून टाकण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, आता पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्स भारतात बॅन करण्यात आले आहे.


अनेक भारतीय या पाकिस्तानी कलाकारांना फॉलो करत होते, त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्येही घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये फवाद खान. माहिरा खान, हानिया आमिर, मावरा होकेन, आतिफ अस्लम आणी अली जाफर यांचे मात्र अद्याप अकाऊंट बॅन करण्यात आलेले नाहीत.


भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले असल्यामुळे, सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठी घट झाली असण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्रामवर या पाकिस्तानी कलाकारांचा युजर आयडी सर्च केला की, 'अकाऊंट भारतात उपलब्ध नाही, असं दिसतं.

Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर