Pahalgam Attack : राष्ट्रीय सुरक्षा मंडळात महत्त्वाचा बदल; माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केला आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी आज (दि ३०) बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्‍ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्‍य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य काही सदस्‍यही सहभागी झाले होते.


पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती (CCS) बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सीसीएस बैठकीसह, पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) यांच्या बैठका बोलावण्यात आल्या. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा मंडळात बदल करण्यात आले. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारत तयारी करत आहे.


राष्ट्रीय सुरक्षा मंडळात आणखी ७ सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी पश्चिम हवाई कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिण लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर अ‍ॅडमिरल माँटी खन्ना या लष्करी सेवांमधून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलीस सेवेतून (IPS) निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. सात सदस्यीय मंडळात बी. व्यंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस (IFS) अधिकारी आहेत.

Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा