Ratnagiri News : समुद्रात बोट बुडाली पण 'अल फरदिन'ने वाचवले १६ तरुणांचे प्राण!

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टी सुरु झाली असून मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांवर गर्दी होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेमुळे समुद्र असलेल्या ठिकाणी पर्यटकांची जास्त पसंती मिळते आहे. अशातच रत्नागिरी जवळ असलेल्या पूर्णगड येथील समुद्रात काही तरुण मौजमजा करण्यास गेले असता बोट उलटल्याचे समोर आले आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रनपार गावातील १६ तरुण काल (दि २९) सायंकाळच्या सुमारास मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट पलटी होऊन सर्व तरुण बोटींसोबत पाण्यात पडले. पाण्यात पडलेल्या तरुणांपैकी एकालाही पोहता येत नव्हते.


सुदैवाने जवळच असलेल्या अल फरदिन बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेची गांभीर्यता लक्षात घेवून तात्काळ मदतीला धावले. त्याचवेळी, रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान अंतर्गत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सिल्वर सन पायलट बोटीवरील पोलीस कर्मचारी मुजावर, विजय वाघब्रे, आणि अपूर्व जाधव यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व १६ तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. बाहेर काढलेल्या तरुणांना प्रथमोपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत सरस्वती नावाची बोट समुद्रात बुडाली.

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर