Gautam Adani : गौतम अदानींना दिलासा! अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणात मिळाली क्लीन चिट

  49

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकन न्यायालयाने लाचखोरी प्रकरणाबाबत दोषी ठरवले होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले होते. या प्रकरणामुळे अदानी समुहाला मोठ्या अडचनींचा सामना करावा लागला होता. मात्र आता अमेरिकेत सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात (US bribery case) आघाडीचे उद्योगपती अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे.



अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाबाबत स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नसून, अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, 'स्वतंत्र चौकशीनंतर अदानी ग्रीन किंवा त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी कोणत्याही नियमांचे किंवा कायद्यांचे उल्लंघन केले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचबरोबर अदानी कंपनी भविष्यातही सर्व नियम आणि कायदे पाळत राहील', असेही म्हटले आहे.



नेमके प्रकरण काय?


भारतीय वीज प्रकल्पाचा करार मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोपाखाली नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक विनीत एस. जैन यांना अटक केली होती. निधी उभारताना अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. या आरोपांअंतर्गत, अदानी ग्रुपवर २३६ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणाचा अदानी समुहाचे शेअरर्स धडाधड कोसळले असून केनियाने अदानींशी संबंधित प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला होता.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने