'गजवा अल हिंद'शी काँग्रेसचा संबंध काय ?

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची कोंडी करा, पाकिस्तानला धडा शिकवा असे बोलू लागला आहे. पण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते वेगळा विचार करत आहेत की काय, असे चित्र आहे.







पंतप्रधान मोदी वापरतात तसेच कपडे असलेला एक फोटो काँग्रेसने एक्सवरुन पोस्ट केला आहे. या फोटोत कपडे आहेत. पण कपडे घातलेला माणूस गायब आहे. विशेष म्हणजे मुसलमानांशी संबंधित संघटनेने केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये गजवा अल हिंद असा भारत विरोधी उल्लेख आहे. एकाचवेळी दोन संघटना भारताविरोधात अशी गरळ ओकतात आणि त्यातील एक संघटना भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेकी एक आहे.

काँग्रेस सर तन से जुदा अर्थात शिर धडापासून वेगळे करण्याच्या विचाराला प्रोत्साहन देणारी एक्स पोस्ट करते. दुसरीकडे मुसलमानांशी संबंधित संघटना भगवान शंकराचा सर तन से जुदा स्वरुपातला फोटो तयार करुन प्रसिद्ध करते. हा काय प्रकार आहे ? दोन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे ? असे सवाल भाजपा खासदार डॉ. निशकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. आता भारत - पाकिस्तान तणाव वाढला असताना काँग्रेस तसेच काहीतरी करू इच्छित आहे का ? जर याचे उत्तर हो असेल तर काँग्रेस नेमकी कोणाचे हित साधण्यासाठी धडपडत आहे ?
Comments
Add Comment

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट