पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उडान कॅफे’ हे उपहारगृह आजपासून सुरू करण्यात आले आहे. या कॅफेमधून विमान प्रवाशांना विमानतळावर स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत.


‘उड़े देश का आम नागरिक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वात ‘उडान कॅफे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना 10 रुपयांत पाणी आणि चहा, 20 रुपयांत कॉफी, 20 रुपयांत समोसा आणि 20 रुपयांत मिठाई उपलब्ध होत आहे.

कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई या विमानतळांवर ही सेवा सुरू केली असून, या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता ही सेवा आजपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले . या सेवेमुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुणे - अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘ॲप’चा वापर

पुणे : शहरात होणारी अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून

एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे