Vijay Deverakonda : ‘छावा’ पाहून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा संतापला!

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने आताच एका कार्यक्रमात त्यावर प्रतिक्रिया दिली. छावा या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. विकी कौशलने छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच रश्मिकाने संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. आणि अक्षय खन्ना यांनी औरंगजेब यांची भूमिका साकारली आहे.लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे.


विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील एका व्यक्तीरेखेवर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संधी मिळाल्यास त्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची इच्छा विजयने बोलून दाखवली आहे.



साऊथ सुपरस्टार सूर्याच्या आगामी 'रेट्रो' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात विजय प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी निवेदिकेनं विजयला एक प्रश्न विचारला. "तुला भूतकाळात जाऊन कोणाला भेटायला आवडेल", असं तिने विचारलं. त्यावर विजयने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण चकीत झाले."मला ब्रिटिशांना भेटायचं आहे आणि त्यांच्या दोन कानाखाली वाजवायचं आहे. मी नुकताच छावा हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर मला खूप राग आला. मला संधी मिळाली तर मी भूतकाळात जाऊन औरंगजेबाच्या दोन-तीन कानाखाली वाजवेन. अशा इतरही अनेक व्यक्तींना मला भेटून त्यांना मारायचं आहे. पण सध्या तरी मला हीच नावं आठवतायत", असं तो म्हणाला.


'छावा' या चित्रपटाने भारतात कमाईचा 600 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


Comments
Add Comment

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या