भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

Share

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. तेव्हापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांना आता भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीती वाटत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २६)  झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पूर आला आहे.

अचानक झेलम नदीमध्ये पाणी सोडल्याने ही पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे, असे पाकचा आरोप आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पीओके राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटी येथे स्थानिक अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरद्वारे इशारा द्यावा लागला.

सिंधूचे पाणी रोखण्याची भारताकडून तयारी सुरू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीसंदर्भात एक बैठक घेतली. ज्यामध्ये पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन प्रमुख पर्यायांवर विचार केला गेला. पाकिस्तानकडे एक थेंबही पाणी जाऊ नये असा सरकारचा ठाम निर्धार आहे. बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की पाणी रोखण्यासाठी प्रत्येक शक्य त्या उपायांवर त्वरित काम सुरू करण्यात येईल. याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाणी रोखाल, तर १३० अणुबॉम्ब तयार ठेवलेत; पाकिस्तानच्या मंत्र्याची दर्पोक्ती

भारत पाकिस्तानाला धडा शिकविण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानच्या मंत्र्याने चक्क भारतालाच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनिफ अब्बासी यांनी भारताला उघडपणे अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानकडे असलेली घोरी, शाहीन आणि गजनवी ही क्षेपणास्त्रे आणि १३० अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत. जर भारताने सिंधू जल करार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार
राहावे लागेल.

Recent Posts

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…

41 minutes ago

NCERT Textbook Update : सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व…

44 minutes ago

नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं… हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…

1 hour ago

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा  नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…

1 hour ago