Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २७ एप्रिल ते ३ मे २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, २७ एप्रिल ते ३ मे २०२५

लाभप्रद स्थिती निर्माण होईल

मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणीच्या विकासासह साहसी व पराक्रमी वृत्तीत वृद्धि होईल. कुटुंब परिवारामध्ये एकीची भावना दृढ होऊन भावंडांमध्ये वाढते सहकार्य असेल. कुटुंबात महत्त्वाच्या घडामोडी. कार्य ओळखीच्या माध्यमातून पूर्ण होऊन लाभप्रद स्थिती निर्माण होऊ शकते. वैयक्तिक जीवनात मात्र काही वेळेस ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता. आपल्या स्वभावातील बदल याला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या स्वभावात परिवर्तन होऊन गूढता येईल. आपल्या क्रोधावर व वागणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आपल्याजीवनसाथीच्या भावना आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता. तशीच आपली मते इतरांवर लादू नका.

भरभराट होईल

वृषभ : पूर्वर्धापासूनच आपल्याला शुभ ग्रहांचे पाठबळ लाभेल. अनुकूलता वाढेल. व्यवसाय धंद्यात उत्तम संधी मिळतील. विशेषतः आयात-निर्यातशी संबंधित व्यवसायाची भरभराट होईल. तसेच तांत्रिक ऑटोमोबाइल क्षेत्रात उलाढाल वाढेल. अत्याधिक लाभाची शक्यता. पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती यशस्वी ठरतील. नोकरीचा शोध संपुष्टात येईल. सरकारी स्वरूपाची कार्य प्रभावशाली व्यक्तीमार्फत पूर्ण होतील. जमीनजुमला संपत्ती विषयीच्या कामातून विशेष लाभ होण्याची शक्यता. आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. या कार्यात आपल्याला कुटुंबातील ज्येष्ठांची मदत मिळू शकते. तरुण-तरुणींचे विवाह जुळतील.

स्पर्धेत यश मिळू शकते

मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या समस्या संपुष्टात येतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. सामाजिक मानसन्मान मिळवून पत प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या व बुद्धी कौशल्याच्या जोरावर दीर्घकाळ रखडलेली कामे खुबीने पूर्ण करू शकाल. समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा तसेच ओळखी मध्यस्थीचा उपयोग करून घ्याल. स्वास्थ्य चांगले राहून आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नोकरीमध्ये अनुकूल घटना घटित होऊन विरोधक नतमस्तक होतील. वरिष्ठांची तसेच सहकाऱ्यांची मर्जी टिकून राहील. आपल्या समोरील कार्ये वेगाने पूर्ण करू शकाल. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल

कर्क : सध्याच्या कालावधीमध्ये जुनी नाती नव्याने प्रस्थापित होऊन जुने मित्र मंडळी भेटू शकतात. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. जुने वाहन बदलण्याची इच्छा बरेच दिवस मनात घोळत होती ती या दिवसात पूर्ण होऊन नवीन वाहन खरेदी करू शकाल. कुटुंबात आपल्या वडिलांकडून अथवा ज्येष्ठांकडून एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती बदलेल. काही नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. नवीन नियोजन करू शकाल. नोकरी व्यवसाय धंद्यात वर्तमानात येणारी असलेली आव्हाने स्वीकारून आपण त्यावर मात करू शकाल.

सफल रहाल

सिंह : ज्या जातकांचा परदेशी व्यापार-व्यवसाय अनुबंध आहे अथवा जे जातक बहुराष्ट्रीय अस्थापनांबरोबर संबंधित आहेत अशा जातकांचा भाग्योदय होईल. नोकरीत पदोन्नती वेतन समृद्धी मिळेल. इतर व्यवसायात आपण परदेशी असलेले संबंध अधिक दृढ बनवण्यात सफल रहाल. परदेशगमनाची संधी. नव्या करारांची शक्यता. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपल्याला स्वतःचे स्वास्थ्य संबंधी अधिक सतर्क राहावे लागेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. आंतरिक समाधान मिळेल.

दीर्घकालीन फायदा

कन्या : सध्याच्या कालावधीमध्ये आपण काही खास लोकांच्या संपर्कात याल. नवे अनुबंध जुळतील. याचा आपल्याला दीर्घकालीन फायदा आपल्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. स्पर्धकांवरती मात करू शकाल. प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक परिस्थिती सुधारेल. व्यवसाय-धंद्यात तसेच अपेक्षित असलेले सहकार्य मिळत राहील. आर्थिक स्तर उंचावेल. आपण उत्साहाने कार्यमग्न रहाल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण वेगळे ठेवा. पदोन्नती मिळू शकते.

मालमत्तेमध्ये वृद्धीचे योग

तूळ : काही शुभ योगांमुळे आपण लाभान्वित व्हाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहून व्यवसायात यश आणि प्रसिद्धी मिळवता येईल. ऑटोमोबाईल तेलक्षेत्र कायदेशीर सेवा इत्यादी प्रकारच्या व्यवसायांमध्ये लाभ प्राप्त होतील. आपल्या स्थायी मालमत्तेमध्ये वृद्धीचे योग आहेत. आपल्या व्यवसाय तसेच कार्यक्षेत्रात कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळीचे वातावरण राहील. वाढते खर्चाचे प्रमाण आपल्याला अस्वस्थ करू शकते. कुटुंबातील महिला कुटुंबातील कार्यात व्यस्त राहतील. नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांचे त्यांच्या कामाबद्दल आपल्या कार्यक्षेत्रात कौतुक होईल.

समस्यांचे निवारण करू शकाल

वृश्चिक : भूतकाळातील जुने संबंध नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता परंतु ते संबंध पुन्हा नव्याने जोडावयाचे अथवा नाही हे पूर्ण विचारांती ठरवणे महत्त्वाचे ठरेल. नंतर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. रोजच्या जीवनात काही नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सभोवतालच्या परिस्थितीचे पूर्ण आकलन करून नंतर निर्णय घ्या. समस्यांचे निवारण करू शकाल. पूर्वार्धमध्ये आपल्या नोकरी व्यवसाय धंद्यात काही वेळेस ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आपण आपल्या विचारशक्तीच्या जोरावर योग्य निर्णय घेऊ शकाल. अनामिक भीती दूर होईल.

कठीण कार्य पूर्ण करता येतील

धनू : काही महत्त्वाची कठीण कार्य पूर्ण करता येतील. ज्यामुळे आपल्या जीवनात प्रगती करून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल. नवीन नवीन संधी मिळतील. त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे राहील. रखडलेली कार्य पूर्ण करता येतील. तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन कर्जमुक्त होता येईल. कुटुंबातून सहकार्य लाभेल. समाधानी राहाल. नोकरीत अनुकूलतेमध्ये वृद्धी होऊन वेतन वृद्धि पदोन्नती मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.

उन्नती प्रगती करण्याच्या संधी

मकर : आपली कारकीर्द प्रकाशझोतात येऊन प्रशंसेस पात्र ठराल. व्यवसाय धंदा नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती अनुभवता येईल. नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन बक्षिसी मिळू शकते. अनपेक्षित शुभवार्ता मिळतील. उन्नती प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील. आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास करावा लागण्याची शक्यता. नोकरीमध्ये बदलीची शक्यता. कामाच्या स्वरूपात बदल तसेच अधिकारात वृद्धी. वैवाहिक जीवनात परिस्थिती अनुकूल राहील. कुटुंबात आपली मते इतरांवर लादू नका. व्यवसाय-धंद्यात येणी वसूल होतील मात्र वसुली करताना वाद-विवाद टाळा.

नियोजन यशस्वी होईल

कुंभ : सुरुवातीपासूनच आपण सकारात्मक राहणे जरुरीचे आहे. कोणत्याही क्षेत्रातील वादग्रस्त प्रश्न समस्या जपून हाताळा. आपल्या सकारात्मक राहण्याने आपल्याला वेगवेगळ्या लाभांनी लाभान्वित होता येईल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. चालू नोकरीत अचानक काही समस्या उद्भवू शकतात. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच वरिष्ठांबरोबर मतभेद डोके वर काढू शकतात. सावधानतेने समस्या हाताळणे हितकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन नियोजन करण्याच्या विचारात असल्यास नियोजन यशस्वी होईल.

कडू-गोड अनुभव येतील

मीन : कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची आवश्यकता. कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जुगार सदृश्य व्यवहार व तेजी-मंदी संबंधित व्यवहार यापासून अलिप्त राहा. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल. आपल्या वैवाहिक जीवनात कडू-गोड अनुभव येतील. कुटुंबात किरकोळ कारणावरून कलह सदृश्य प्रसंग निर्माण होण्याची शक्यता. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात सफलता मिळू शकते. व्यवसाय-धंद्यात नव्या संकल्पनांचा-नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायासाठी पोषक ठरेल.

Recent Posts

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

18 minutes ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

51 minutes ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

3 hours ago

Jalgaon Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याच्या रागात जन्मदाता उठला मुलगी अन् जावयाचा जीवावर

जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो,…

3 hours ago

IPL 2025 : आयपीएलच्या सुरक्षेत वाढ; जाणून घ्या कारण

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशातच आता भारतात सुरू…

3 hours ago

Mann Ki Baat: दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एकजूट होण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

नवी दिल्ली: पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये…

3 hours ago