वासुदेव आला - कविता आणि काव्यकोडी

हातात चिपळ्या
गळ्यात माळा
मोरपिसांची टोपी
गाता गळा

घोळदार झगा
काखेत झोळी
खांद्यावर शेला
टिळा कपाळी

पावा वाजवीत
अंगणात येई
देवाची गाणी
सुरात गाई

सुपातील धान्य
झोळीत घेई
‘दान पावलं...’
आरोळी देई

मुलांचा घोळका
जमतो भोवती
आनंदाला मग
येतेच भरती

सकाळच्या पारी
हरीनाम बोला
गाव जागं करायला
वासुदेव आला
हो वासुदेव आला...

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१)किलबिल याच्या
पडती कानी
यालाच सुचतात
फुलांची गाणी

फांद्या याच्या
हलती छान
हसते कोणाचे
पान न् पान ?

२) येथे भेटते
मित्रमंडळ
गुरुजी, बाई
खूप प्रेमळ

वह्या, पुस्तके
आणखी अभ्यास
कोठे होतो
आपण पास?

३) गाय, वासरू
मांजर, मोती
मला पाहताच
हरखून जाती

त्यांच्याशी आहे
माझी दोस्ती
कोण बरं हे
माझे सोबती?

उत्तर -


१) झाड
२) शाळा
३) पाळीव प्राणी
Comments
Add Comment

क्षण कसोटीचे

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवी जीवन म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा, संधी-अडचणी आणि चढ-उतारांनी

जान है तो जहान है!

- प्रतिभारंग, प्रा. प्रतिभा सराफ चहा बरोबर बाजूला भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेले पोहे खायला घेतले आणि

भेदभाव

- कथा, रमेश तांबे या समोर पुस्तक ठेवून बसली होती. पण तिचं लक्ष पुस्तकात अजिबात नव्हतं. दूरवरून कुणालाही वाटेल की

ज्वालामुखी कसा होतो?

- विज्ञानकथा, प्रा. देवबा पाटील शिवम व त्याच्या मित्रांची प्रश्नोत्तरे सुरूच होती. “भूकंपनाभी म्हणजे काय असते?”

भूकंप कसा होतो?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सहलीवर गेलेले शिवम व त्याचे मित्र आता परत निघाले होते. ते महादेवाच्या मंदिराची

दैव

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घराबाहेर पडताना आठवणीने आपण सर्व हातात बाळगतो ती