पाकिस्तानने भारताला दिली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी भारताला सिंधू नदीचे पाणी थांबवल्यास युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा देताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर भारताने युद्धासाठी तयार व्हावे. घौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्र फक्त प्रदर्शनासाठी नाहीत. भारताला उत्तर देण्यासाठीच ठेवली आहेत. आम्ही १३० अण्वस्त्रे प्रदर्शनात मांडण्यासाठी ठेवलेली नाहीत. ती पाकिस्तानात कुठे आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. पण हवी तेव्ही आम्ही ती वापरू; या शब्दात पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.



भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर रक्ताचे पाट वाहतील, असे पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला सांगितले. सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील - एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त अशी भाषा पाकिस्तानच्या मंत्र्यांने केली.

पहलगाम अतिरेकी हल्ला

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची नाव आणि धर्म विचारून हत्या केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला तर पाकिस्तान सिमला करार स्थगित करेल, अशी भाषा पाकिस्तानने केली. आता त्यापुढे जात पाकिस्तानने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी भारताला दिली आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कमी म्हणून पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगितले आहे.

भारताने पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भारतीय दूतावासातील कर्मचारी स्वतःच कमी केले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारीही कमी करण्याचे निर्देश भारताने दिले आहेत. पाकिस्तानच्या दूतावासातील सैन्याच्या दूतांनाही देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा