मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील नारायणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा – टकरावत फाट्याजवळ घडली. अपघात आज म्हणजे रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता झाला.
इको व्हॅनच्या चालकाने वेळ वाचवण्यासाठी वेग पटकन वाढवला. पण वेग वाढवल्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यानंतर व्हॅन जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. व्हॅनची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गोबर सिंह आणि एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये असलेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. व्हॅनसह विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी एकाने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यावेळी विहिरीत कारमुळे मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती झाली. या गॅसमुळे विहिरीत उतरलेल्या मनोहर सिंह याचा मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले.
व्हॅनमध्ये चालक आणि दोन मुलांसह एकूण १३ जण होते. हे सर्वजण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील मानसा भागात असलेल्या अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. वेळ वाचवण्यासाठी चालकाने व्हॅनचा वेग वाढवला आणि अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना वाचवण्यात आले. जखमींना मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरही घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…