Seema Haider: "मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या", सीमा हैदरचे मोदींना साकडं

उत्तर प्रदेश: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करण्यासह अनेक कठोर पावले उचलण्यात आली. ज्यामध्ये भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांचा व्हिसा संपण्यापूर्वी देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मूळची पाकिस्तानी असलेल्या सीमा हैदर (Seema Haider) ला सुद्धा आता गाशा गुंडाळावा लागण्याची भीती वाटत असल्यामुळे, "मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या" अशी साकडं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारकडे घातली आहे.


२०२३ मध्ये सीमा हैदरने तिच्या भारतीय प्रियकर सचिन मीनाशी लग्न करण्यासाठी पाकिस्तान सोडले तेव्हा ती चर्चेत आली होती. तिचे लग्न पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आधीच झाले होते. तरीही ती तिच्या मुलांसह नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली होती. सध्या सीमा हैदर उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात राहत असून, अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. आता ती चार मुलांची आई बनली आहे.



सोशल मीडियावर व्हिडीओ केला पोस्ट


सीमाचा भूतकाळ पाहता ती मूळची पाकिस्तानी असल्याकारणामुळे तिला देखील इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे भारत सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, "मला पाकिस्तानला जायचे नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की मला भारतात राहू द्या." असे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सीमाने सरकारकडे विनंती केली आहे.



सीमा आता पाकिस्तानी नाही- वकिलाने केला दावा


सीमाचा दावा आहे की सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारला. देशभरातून झालेल्या विरोधानंतरही, तिच्या वकिलाला आशा आहे की तिला भारतात राहण्याची परवानगी मिळेल. ती आता पाकिस्तानी नागरिक राहिली नसल्याचा दावा सीमाच्या वकिलाने केला आहे.


दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिक राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. सीमाच्या वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.



पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपासून होणार रद्द


सरकारच्या निर्णयानंतर परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द केले जातील. तर वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिलपर्यंत वैध राहतील. त्यामुळे सीमा हैदरच्या बाबतीत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

अयोध्येत रामभक्तांची गर्दी

४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन लखनऊ : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात

माओवादी कमांडर बारसे देवाचे तेलंगणात आत्मसमर्पण

तेलंगणा : ‎छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा व दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा ऊर्फ सुक्का

FASTag Rules : आता टोल नाक्यावरुन सुसाट जा...! फास्टॅगच्या 'KYV' कटकटीतून कायमची सुटका; NHAI चा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी