दवबिंदू कसे पडतात?

Share

कथा – प्रा. देवबा पाटील

दररोज सकाळी नेहमी उशिरा उठणारा स्वरूप आता रोज सकाळी लवकर उठू लागला व आपल्या आजोबांसोबत बाहेर मोकळ्या हवेत मस्त फिरायला जाऊ लागला. असेच त्या दिवशीही ते दोघे फिरायला निघाले.

चालता चालता स्वरूपचे लक्ष गवताच्या झाडाच्या पानांवरील थेंबांकडे गेले. “आज सकाळी पाऊस नसूनही झाडांच्या पानांवर, हिरवळीवर ते पाण्याचे चमकदार थेंब कसे काय पडलेले दिसतात हो आजोबा?” स्वरूपने विचारले.

“वातावरणातील पाण्याच्या वाफेचे थंडीने गोठून जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूंवर हिमस्फटिक बनतात तेव्हा त्याला दहिवर किंवा दव म्हणतात. ब­ऱ्याच वेळा रात्री हवेपेक्षा झाडाझुडपांची, वनस्पतींची पाने, गवत अधिकाधिक थंडगार होतात. हवेतील बाष्पकण जेव्हा या थंडगार पानांवर पडतात तेव्हा त्यांचे पाण्याच्या थेंबात रुपांतर होते. पाण्याच्या या गोलाकार थेंबांना “दवबिंदू” म्हणतात. सूर्योदयाबरोबर त्यांवर पडलेल्या प्रकाशामुळे हे दवबिंदू छानपैकी चमकतात. असे अनंत दवबिंदू एकत्र आल्याने “दव” बनते.” आजोबांनी सांगितले.
“आजोबा दवबिंदू गोलाकारच का दिसतात?” स्वरूप म्हणाला.

“दवबिंदू म्हणजे पाण्याचा थेंबच असतो. निसर्गाचा असा नियम आहे की, कोणतीही वस्तू शक्य तितका आपला पृष्ठभाग कमी होईल असा आकार धारण करते. गोलाकार हाच कमीतकमी पृष्ठभाग असलेला आकार असतो. कोणत्याही द्रवाच्या एका थेंबामध्ये लाखो रेणू असतात. त्यांच्यामध्ये खूप आकर्षण असते. त्यामुळे हे सारे रेणू परस्परांना स्वत:कडे ओढून धरण्याचा सतत प्रयत्न करत असतात. थेंबाच्या आतील भागातील रेणू हे थेंबाच्या पृष्ठभागावरील रेणूंना आपल्याकडे खेचून घेत असतात. तसेच पृष्ठावरील रेणूसुद्धा एकमेकांना आपल्याकडे ओढत असतात. म्हणजेच दवबिंदूच्या पृष्ठभागावर चोहीकडून पृष्ठीय ताण असतो. रेणूंच्या या आपसातील ओढाताणीमुळे म्हणजेच त्या ताणाने द्रवाच्या दवबिंदूचा आकार लहानात लहान असा तयार होतो. कोणत्याही इतर आकारांपेक्षा गोल आकाराचा पृष्ठभाग हा सर्वात लहान असतो म्हणून दवबिंदू हा गोलाकार बनतो.” आजोबांनी स्पष्टीकरण दिले.

“हे दवबिंदू चमकदार का दिसतात हो आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला.
आजोबा म्हणाले, “दवबिंदूच्या थेंबावर पडलेल्या प्रकाशाचा काही भाग हा त्यातून पलीकडे आरपार जातो. त्यामुळे तो पारदर्शक दिसतो. तसचे काही प्रकाश त्यावरून परावर्तितही होतो. त्यामुळे तो चमकदारही दिसतो. अत्यल्प प्रमाणात प्रकाश दवबिंदूत शोषलाही जातो. हे गोलाकार दवबिंदू भरीव असल्याने बहिर्वक्र भिंगासारखे कार्य करतात म्हणून त्यातून गवताचे पान आपणांस थोडेसे मोठेही दिसते.”
“मग ते दिवसा का नाही दिसत आजोबा?” स्वरूपने विचारले.

“सूर्य जसजसा वर वर येतो तसतशी जमीन तापू लागते, वातावरणात थोडी थोडी उष्णता वाढू लागते व जमिनीवरील वस्तू, झाडेझुडपेही तापू लागतात. त्यामुळे त्यांवर असणा­ऱ्या दवाची वाफ होऊन ते दवबिंदू नाहीसे होतात.” आजोबा म्हणाले.
“दव कमी-जास्त कोणत्या काळात पडतो?” स्वरूपने प्रश्न केला.

“आकाश जेव्हा निरभ्र असते तेव्हा हवेत पाण्याची वाफ जास्त असते. झाडेझुडपे, गवत, रोपटे ही रात्री थंड असतात म्हणून या वेळी दव जास्त पडतो. थंडीच्या दिवसांत दव जास्त पडतो. जेव्हा वातावरण ढगाळलेले असते तेव्हा झाडेझुडपे रात्री जास्त थंड नसतात. त्यावेळी दव कमी पडते.” आनंदरावांनी सांगितले व बोलता बोलता मागे फिरले. स्वरूप समजून गेला की आता आपणास घराकडे जायचे आहे. तोही आजोबांप्रमाणे मागे फिरला.

Recent Posts

कणकवली-करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…

9 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…

30 minutes ago

Pakistani YouTube Channel Banned: पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरू न देण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…

40 minutes ago

सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर…

3 hours ago

RR vs GT, IPL 2025: गुजरातची पात्रता फेरीकडे घोडदौड

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार…

3 hours ago

खारदांडा स्मशानभूमी पुन्हा बंद, सहा महिन्यांपूर्वीच केली होती दुरुस्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…

4 hours ago