Akshaya Tritiya : १०० वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्मिळ राजयोग! 'या' राशींचे सुरू होतील चांगले दिवस

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात शुभ काळांपैकी एक मानला जातो. यंदा ३० एप्रिल २०२५ रोजी 'अक्षय्य तृतीया' (Akshaya Tritiya) साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी अनेकजण शुभकार्य करतात. तसेच या दिवशी सोनं-चांदी किंवा इतर गोष्टी खरेदी करतात. अशातच यंदाचा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार लाभदायक ठरणार आहे. तब्बल १०० वर्षानंतर यंदा अक्षय्य तृतीयेला 'गजकेशरी' दुर्मिळ राजयोग (Akshaya Tritiya Gajkeshari Rajyog) तयार होणार आहे. यामुळे काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



धनु रास


या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. यासोबतच, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने, प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. शत्रूच्या बाजूने शांती असेल. याद्वारे तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळवू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील.



सिंह राशी


या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रकल्प मिळू शकेल. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.



वृषभ राशी


या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप चांगला असू शकतो. आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल. यासोबतच पगारवाढीसोबत पदोन्नती देखील मिळू शकते. अध्यात्माकडे कल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.



अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya Muhurt)


बुधवार, ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.



अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त


३० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीयेला तुम्ही माती, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरीदेखील खरेदी करू शकता.

Comments
Add Comment

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या

जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड