मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक अवैधरीत्या राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात राहू नये. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून, पोलीस किंवा इतर यंत्रणांना त्यांचा पत्ता लागलेला नाही. नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, तर ठाणे शहरात ११०६ आणि नवी मुंबईत २३९ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० जणांची नोंद आहे. सध्या राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा या नागरिकांचा तपास घेत आहेत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आणि अवैधरीत्या राहणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…