Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; 'या' ठिकाणी नक्की भेट द्या!

  79

मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र आता पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघासह काळ्या रंगाच्या वाघांची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानात 'काळे वाघ' पाहायला मिळणार आहेत. "काळा वाघ" हा शब्द ऐकला की अनेक लोकांच्या डोळ्यापुढे एक गूढ आणि दुर्मीळ प्राणी उभा राहतो. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



"काळा वाघ" हा प्रत्यक्षात सामान्य वाघ आहे. पण त्याच्या अंगावरचे पट्टे अधिक गडद आणि जवळपास असल्यामुळे तो पूर्ण काळा असल्याचे दिसून येत आहे. या वाघाला मेलॅनिस्टिक वाघ (Melanistic Tiger) असे म्हणतात. मूळात हे बंगाल टायगर आहेत, पण एका विशिष्ट जनुकांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या अंगावरील पट्टे जास्त काळे झाले आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यातील 'सिमिलीपाल टायगर रिझर्व्ह' या ठिकाणी काळसर-मेलॅनिस्टिक वाघांचे अस्तित्व प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे.



'सिमिलीपाल'ला मिळाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा


२४ एप्रिल २०२५ रोजी ओडिशा सरकारने अधिकृत अधिसूचना जारी करून सिमिलिपालला भारतातील १०७वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल दक्षिण आणि उत्तर वन विभागांतील ११ रेंजमध्ये हे उद्यान पसरले आहे.



‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?


‘मेलॅनिस्टिक’ हा शब्द मेलॅनिझम (Melanism) या संज्ञेपासून आला आहे. हे एक आनुवंशिक (genetic) स्थिती आहे. ज्यामध्ये प्राण्याच्या त्वचेमध्ये, केसांमध्ये किंवा फरामध्ये "मेलॅनिन" नावाच्या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तो प्राणी खूप गडद किंवा काळसर दिसतो.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या