प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. भारताने पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याची धडपड सुरू केली आहे. गरज पडली तर सिमला करार मोडू अशी धमकी पाकिस्तानने दली आहे. यामुळे भारत - पाकिस्तान यांच्यात लढाई होण्याची शक्यता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची ताजी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे.



पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय गंगाजळी आता फक्त १५.४३६ बिलियन डॉलर एवढीच उरली आहे. पाकिस्तानमध्ये 'रोटी' करण्यासाठीचा आटा (पीठ) भारताच्या तुलनेत दुपटीने महाग आहे. पाकिस्तानमध्ये पाच किलो आटा किमान ५६० रुपये दराने उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तानमध्ये तांदूळ २७५ रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये चण्याची डाळ ५७५ रुपये किलो या दराने मिळत आहे. तसेच पाकिस्तानमध्ये साखर १८५ रुपये किलो आणि सफरचंद ५३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी टोमॅटो ८१ रुपये किलो दराने मिळत आहे.



डिसेंबर २०२४ पर्यंत पाकिस्तानवरचे परकीय कर्ज १३१.१ बिलियन यूएस डॉलर वर पोहोचले. या कर्जाचा विचार करता प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. पाकिस्तानने चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून मोठे विदेशी कर्ज उचलले आहे. हे कमी म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ४.४ बिलियन यूएस डॉलरचे कर्ज घेतले आहे.

भरमसाठ कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने हप्ते फेडणे पण कठीण झाले आहे. वारंवार विनंती करुन पाकिस्तानने २०२४ मध्ये चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून कर्जाच्या परतफेडीची मुदत एक वर्षाने वाढवून घेतली. हे करण्याच्या बदल्यात पाकिस्तानला अनेक अटी शर्तींचे पालन करण्याची तयारी दाखवावी लागली.
Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या