ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा त्रास वाढतो आहे. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ, सूज येणे किंवा सतत पाणी असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
ठाण्यामध्ये उन्हाळ्यात एरवी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असत. मात्र गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नकोसे वाटत. अशातच उन्हात जास्त फिरल्पामुळे चक्कर येणे, पोटात मळमळ डी हायड्रेशन सारख्या बाबींबरोबर डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
“उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे. डोळ्याचा त्रास अधिक जाणवत असेल तर कोणताही घरगुती उपाय न करता रुग्णालयात नेत्र चिकित्सकाना डोळे दाखवावेत. – डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय) सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र विभागात उन्हामुळे डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, सूज आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती नेत्र तब्ज डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.
जळजळ व लालसरपणा, उष्णतेमुळे डोळे कोरडे व अस्वस्थ होतात. कंजंक्टिव्हायटिसः संसर्गजन्य आजार वाढत असून, डोळ्यांत सूज व पाणी येणे यासारखी लक्षण दिसत आहेत. प्रकाश संवेदनशीलता (फोटोफोबिया): उन्हामुळे प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. उन्हात फिरताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सनग्लासेस वापरा डोळ्याना चोळू नकाः अस्वस्थता वाटल्यास स्वच्छ कपडनाने सौम्यपणे पुसा, टोपी किया छत्री वापरा, डिजिटल स्क्रीनपासून २० फूट लावून बघा, सतत मोबाईल बघू नका, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…