ठाकरे गटाच्या नेत्याच्या आशीर्वादाने कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय!

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी एकदा समोर आलंय. केज तालुक्यात ‘कला केंद्रा’च्या आड वेश्याव्यवसाय (Prostitution) चालवला जात असल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे आणि या वेश्याव्यवसायाला ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप केला जात आहे.


उबाठा गटाचे नेते रत्नाकर शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या 'महालक्ष्मी कला केंद्रा'वर बीड पोलिसांनी काल रात्री धाड टाकली. या छाप्यात १० महिलांची सुटका करण्यात आली असून, या केंद्राचा व्यवस्थापक अनैतिक कृत्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या रॅकेटचे पुरावे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्यात आले होते, परंतु कारवाईस वेळ लागल्याने ‘राजकीय हस्तक्षेपामुळेच प्रकरण झाकलं जात होतं’, असा संशय आता बळावला आहे.



या घडामोडीवरून एक प्रश्न उपस्थित होतो की, राजकीय वरदहस्त असलेल्या 'कला केंद्रां'च्या आड चालणाऱ्या व्यवसायांकडे पोलिसांनी याआधी दुर्लक्ष केलं का?


२०२३ मध्येही याच केंद्रावर रेड झाली होती, पण कारवाई केवळ 'फॉरमॅलिटी'पुरती मर्यादित राहिल्याचं आता स्पष्ट होत आहे. पोलिसांनी PITA कायद्यासह भारतीय दंड संहितेची कठोर कलमे लावत मालक, त्याचा मुलगा आणि व्यवस्थापकावर गुन्हे दाखल केले आहेत.


या प्रकरणातून बीडमधील राजकीय-गुन्हेगारी साटे-लोटे असलेलं नवं पान उघड झालं आहे. कला, संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा ‘उद्योग’ केवळ सामाजिक प्रश्न नाही, तर राजकीय नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.


आता प्रश्न असा की, कारवाई खरंच गुन्हेगारांवर होईल, की पुन्हा राजकीय दबावाखाली सगळं ‘निपटून’ जाईल? अशी चर्चा सुरु आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे