Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले


मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे जाण्यापूर्वी जेवण करण्यास एका हॉटेलमध्ये थांबलेल्या ११ जणांच्या कुटुंबाचे ऑर्डर मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे प्राण वाचले आहे. कारण जेवणात आलेल्या खारट फ्राईड राईसमुळे त्यांना पुन्हा नवीन ऑर्डर येण्याची वाट पाहात बसावे लागले. ज्यामुळे पुढे त्यांच्यासोबत होणारा अनर्थ टळला.

काळ आला होता पण वेळ नाही, असे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधून थोडक्यात वाचलेल्या केरळच्या एका कुटुंबियांबद्दल बोलता येईल. अल्बी जॉर्ज, त्यांची पत्नी लावण्या, त्यांची मुले, लावण्याचे आई-वडील आणि काही भावंडं अशी ११ जण गेली काही दिवस जम्मू काश्मीरच्या सफरीवर होती. १८ एप्रिल रोजी ते कोचीहून निघाले आणि 19 एप्रिलला ते श्रीनगरला पोहोचले. त्यांनी गुलमर्ग आणि सोनमर्ग येथे दोन दिवस फिरण्यात घालवले. तिसऱ्या दिवशी हे सर्वजण पहलगामला भेट देणार होते. ठरल्याप्रमाणे हे कुटुंब दुपारचे जेवण आटपून पहलगामच्या दिशेने निघाले होते. मात्र त्याआधीच तिथे गोळीबार झाल्यामुळे वाटेतच ते थांबले.

लावण्याने सांगितले की, "आम्ही मंगळवारी श्रीनगरपासून सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्या पहलगामला निघालो होतो. आम्ही त्या सकाळी थोडे उशिरा निघालो. मागील दोन दिवस धावपळीमुळे जेवण व्यवस्थित केले होते. त्यामुळे माझ्या नवऱ्याने बैसारणला जाण्यापूर्वी जेवणाचा आग्रह धरला. बैसारण फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर होते"

लावण्या पुढे सांगतात कि, "रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण मागवले. मात्र फ्राईड राईस खूपच खारट असल्याने आमच्या अक्षरशः तोंडाची चव गेली. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी आमची नाराजी जाणून घेत ताजं जेवण बनवण्याचा प्रस्ताव दिला. आम्ही पुन्हा जेवण मागवले. त्यामुळे जवळपास एक तास उशीर झाला."

जेवण आटोपल्यानंतर या कुटुंबाने पुन्हा प्रवास सुरू केला. बैसारणपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. लावण्या म्हणाल्या, "आम्ही पाहिले की घोड्यावरुन अनेकजण परत येत आहेत. बरेच लोक ओरडत होते, पण आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती. आम्ही एका गाडीला थांबवले, तेव्हा समजले की गोळीबाराची घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला काहीतरी गंभीर आहे, असे वाटले. त्यामुळे आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला."
Comments
Add Comment

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटानंतर अमित शाहांचा तातडीचा निर्णय; तत्काळ बाहेर पडताच...दिल्लीतील हालचालींना वेग!

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश

Delhi Blast : २ तासांतच एक संशयित ताब्यात! दिल्ली स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५५

भारताचा 'त्रिशूल' सराव यशस्वी!

३०,००० हून अधिक जवानांचा सहभाग, सर्वात मोठी संयुक्त लष्करी कवायत नवी दिल्ली: भारताची सर्वात मोठी त्रि-सेवा

दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! दहशतवादी कटाचा संशय; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला

पुण्यापाठोपाठ हाय-प्रोफाइल 'नमाज'वादाने बंगळुरु विमानतळ हादरले! भाजपचा काँग्रेसवर 'सुरक्षे'वरून हल्लाबोल!

'अतिसंवेदनशील' ठिकाणी परवानगी मिळाली का? - विरोधी पक्षाचा सरकारला थेट सवाल बंगळुरू: पुण्याच्या शनिवार वाड्यातील

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर उद्या मतदान

पाटणा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्यांतील १२२ विधानसभा जागांवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी