Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा 'केसरी 2' फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत तिकिट काउंटरवर तीन दिग्गज सुपरस्टारचे चित्रपट प्रदर्शित झाले. पहिल्या ईदला सलमान खानचा 'सिकंदर', दुसऱ्या १० एप्रिलला सनी देओलचा 'जाट' आणि तिसऱ्या दिवशी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'केसरी चॅप्टर २' (Kesari Chapter 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे बॉक्स ऑफिसचा गल्ला कोणाचा भरणार हे पाहणं महत्त्वाचं होत. मात्र सलमान खानचा सिकंदर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्यामुळे तो सुरुवातीलाच फ्लॉप होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जाट चित्रपट मंद गतीने एकामागून एक विक्रम मोडत आहे. तर अक्षय कुमारचा 'केसरी २' प्रदर्शित होऊन ६ दिवस उलटल्यानंतरही त्याचा गल्ला रिकामाच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमार पुन्हा फ्लॉप होत असल्याची चिन्हे दिसून येत आहे.



'केसरी २' बॉक्स ऑफिसवर (Kesari Chapter 2 Collection) दररोज सरासरी कलेक्शन करत होता. त्यानंतर सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाशी टक्कर झाल्यानंतर चित्रपटाने दररोज कोट्यवधींची कमाई केली. पण आता 'केसरी २' चा वेग मंदावला असून या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आता मोठी घट होत असल्याचे समोर आले आहे.



'केसरी २'ची आतापर्यंतची कमाई  


'केसरी २' च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार अक्षय कुमारच्या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३.२० कोटी रुपये कमावले आहेत. आता चित्रपटाचं एकूण कलेक्शन ४२.२० कोटी रुपये झाले आहेत. चित्रपटाचं बजेट १५० कोटी रुपये असून 'केसरी २'ची ही कमाई बजेटच्या एक तृतीयांशही नाही. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या खात्यात आणखी एक फ्लॉप चित्रपट जमा होणार आहे, असे दिसत आहे. (Kesari Chapter 2 Collection)



सातव्या दिवशी किती होईल कमाई?


'केसरी चॅप्टर २' १८ एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी ३.४३ कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी कमाईत मोठी घट झाली. करण सिंग त्यागी दिग्दर्शित या चित्रपटाची सुरुवात एक अंकी कमाईने झाली. सातव्या दिवसाचे आकडे बाहेर आले आहेत आणि ते अजूनही खूपच कमी आहेत. अंतिम आकडेवारी सायंकाळी समोर येईल.

Comments
Add Comment

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर