मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत तिकिट काउंटरवर तीन दिग्गज सुपरस्टारचे चित्रपट प्रदर्शित झाले. पहिल्या ईदला सलमान खानचा ‘सिकंदर’, दुसऱ्या १० एप्रिलला सनी देओलचा ‘जाट’ आणि तिसऱ्या दिवशी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘केसरी चॅप्टर २’ (Kesari Chapter 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे बॉक्स ऑफिसचा गल्ला कोणाचा भरणार हे पाहणं महत्त्वाचं होत. मात्र सलमान खानचा सिकंदर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्यामुळे तो सुरुवातीलाच फ्लॉप होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जाट चित्रपट मंद गतीने एकामागून एक विक्रम मोडत आहे. तर अक्षय कुमारचा ‘केसरी २’ प्रदर्शित होऊन ६ दिवस उलटल्यानंतरही त्याचा गल्ला रिकामाच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमार पुन्हा फ्लॉप होत असल्याची चिन्हे दिसून येत आहे.
‘केसरी २’ बॉक्स ऑफिसवर (Kesari Chapter 2 Collection) दररोज सरासरी कलेक्शन करत होता. त्यानंतर सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाशी टक्कर झाल्यानंतर चित्रपटाने दररोज कोट्यवधींची कमाई केली. पण आता ‘केसरी २’ चा वेग मंदावला असून या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आता मोठी घट होत असल्याचे समोर आले आहे.
‘केसरी २’ च्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार अक्षय कुमारच्या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३.२० कोटी रुपये कमावले आहेत. आता चित्रपटाचं एकूण कलेक्शन ४२.२० कोटी रुपये झाले आहेत. चित्रपटाचं बजेट १५० कोटी रुपये असून ‘केसरी २’ची ही कमाई बजेटच्या एक तृतीयांशही नाही. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या खात्यात आणखी एक फ्लॉप चित्रपट जमा होणार आहे, असे दिसत आहे. (Kesari Chapter 2 Collection)
‘केसरी चॅप्टर २’ १८ एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी ३.४३ कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी कमाईत मोठी घट झाली. करण सिंग त्यागी दिग्दर्शित या चित्रपटाची सुरुवात एक अंकी कमाईने झाली. सातव्या दिवसाचे आकडे बाहेर आले आहेत आणि ते अजूनही खूपच कमी आहेत. अंतिम आकडेवारी सायंकाळी समोर येईल.
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…