Sachin Tendulkar: "हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला..." पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

  83

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त केला जात असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने या घटनेसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.





त्याने लिहिले, 'पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला आणि खूप वाईट वाटले. या हल्ल्यातील पीडित लोकं आणि त्यांचे कुटुंब कल्पना पलीकडच्या वेदनांमधून जात असतील. त्यांच्या या दुःखात आपला देश आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत उभे आहे. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल मी शोक व्यक्त करतो, आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करतो."


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेदेखील तीव्र शोक व्यक्त केला आहे.


 

पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्राने व्यक्त केला शोक


ऑलिंपिक खेळाडू पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांनीही हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पीडितांना भावनिक दुःख आणि पाठिंबा व्यक्त केला. "जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना", असे नीरज चोप्रा यांनी एक्स वर लिहिले. तर पीव्ही सिंधूने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी मी दुःख व्यक्त करते. कोणी कधीही अशा क्रूरतेचे समर्थन करू शकत नाही. मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत."
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या