मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांच्या ‘आतली बातमी फुटली’ (Aatli Batmi Futli) या चित्रपटाची घोषणा झाली असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये ‘मास्टर’ मोहन आगाशे (Mohan Agashe) आणि ‘ब्लास्टर’ सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) एकत्र दिसत आहेत. पोस्टरमध्ये मोहन आगाशे यांनी सिद्धार्थ जाधव याच्यावर बंदूक रोखलेली दिसत आहे. मात्र यामागचं कारं काय असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.
दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांच्या ‘आतली बातमी फुटली’ (Aatli Batmi Futli) या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव हे दोन चतुरस्त्र कलाकार प्रेक्षकांसमोर येत आहेत. एखाद्या बातमीमागे असलेल्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी बातमीच्या मुळाशी जावे लागते. वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन बातम्या मिळवाव्या लागतात. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात अशा कोणत्या बातमीचं रहस्य फुटणार आहे? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. दरम्यान ६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
आपल्या वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्यांना जैनेश इजरदार यांची सहदिग्दर्शक म्हणून साथ लाभली आहे. ‘आतली बातमी फुटली’ (Aatli Batmi Futli) या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवादलेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…