IPL 2025 on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ MI विरुद्ध SRH सामन्यात मोठे बदल, मृतांना दिली जाणार श्रद्धांजली

  68

चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू 


हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये आजच्या MI विरुद्ध SRH सामन्यात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयद्वारे काही मोठे बदल करण्यात आले आहे.


आज, बुधवारी (२३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025 ) चा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्ध, या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चार मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम, हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यादरम्यान पंच आणि खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. त्याचप्रमाणे आजचा सामना चिअरलीडर्स आणि फटाक्यांच्या आतषबाजी शिवाय खेळवला जाणार आहे.



MI vs SRH सामन्यात मोठे बदल


आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली देण्याकरिता खेळात काही बदल केले आहेत.
यामधील पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच हातावर काळी फित बांधणार आहेत.


तर दुसरा मोठा बदल असा असेल कि, सामना सुरु होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.


त्यांनतर तिसरा बदल म्हणजे आयपीएलचा उत्साह वाढवण्यासाठी चिअरलीडर असतात पण आजच्या सामन्यात त्यांचाही समावेश नसणार आहे आणि चौथा बदल या सामन्यात कोणत्याही प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी होणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या