मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर, दोन पुणेकर आणि एक पनवेलचा रहिवासी आहे. मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2025
श्रीनगर येथे पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. मी स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून सर्वांशी समन्वय…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 23, 2025
काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. संजय लेले आणि दिलीप देसले (पनवेल) यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मुंबईसाठी श्रीनगर येथून उड्डाण करणार आहे.
पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी ६ वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान १ वाजून १५ मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.