मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सुरु झाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर वर्षभरात दुसऱ्या भागाचीही घोषणा झाली. दोन्ही सीजन गाजल्यानंतर आता देवमाणूस पुन्हा भेटायला येणार आहे. झी मराठीवर ‘देवमाणूस‘ मधला अध्याय या मालिकेचा थरारक प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू झाली.
”देवमाणूस – मधला अध्याय” (Devmanus 3) या मालिकेची कथा पहिल्या आणि दुसऱ्या सीजनमधली आहे. डॉक्टर आजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्या मध्ये तो कुठे होता? काय करत होता? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवल, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळं आपल्याला देवमाणूस मधला अध्याय या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, देवमाणूस या मालिकेचे लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम यांची जोडी करणार असून स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत. तर मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत करणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन्ही सीजनप्रमाणे यंदाही मालिकेत उत्कंठा वाढवणारे कथानक आणि अस्सल गावरान म्हणी, खुसखुशीत संवाद असणार आहेत. तसेच वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, लवकरच तुम्हाला झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.
मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) दिसणार आहे. त्याच बरोबर आधीच्या दोन्ही सीजन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांच मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतार सुद्धा असणार आहेत. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन पात्र पाहायला मिळणार आहेत.
‘सुई बदलली आहे, देवमाणूस तोच आहे. देवमाणूस -मधला अध्याय लवकरच….आपल्या झी मराठीवर!’, अशी कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री रुक्मिणी सुतार म्हणजेच सरुआजी एक गोष्ट सांगत असल्याचे दिसत आहे. “मी सांगते त्याची असली कहाणी.. या गावात डॉक्टर बनून आला, देवमाणूस झाला अन् बायकांची कलमं लावत सुटला. मग बातमी आली.. अपघातात जळून मेला म्हणून, पण कशाचं काय? मुडदा परत आला गावात अन् सुटला बायकांना गंडा घालत. पण एक गोष्ट मला अजून कळली नाही, ह्यो मधे गायब होता, तेव्हा ह्यो लांडगा कुठं वणवा पेटवत फिरत होता,” असा प्रश्न ती विचारते. त्यानंतर ‘देवमाणूस’चं नवीन रुप पहायला मिळतं. यावेळी किरण गायकवाड डॉक्टर नसून टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रोमोमध्ये किरण गायकवाडने घेतलेला ‘या माप घेतो…’ हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, “मस्त पण मधला अध्याय म्हणजे अजितकुमार उर्फ देवी सिंग राजस्थानला असायला हवा ना.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “एक गोळी आणि कायम चा आराम….” तर तिसऱ्या युजरने लिहिले की, “पण काही असो ही सिरीयल वेगळी आणि जरा मस्तच. आता पुढचा सीजन पण तसाच असो आणि त्या म्हातारीला घ्या राव. असे लिहले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…