पाटणा : नमो भारत रॅपिड ट्रेन १६० किमी वेगाने धावणारी, जयनगर सीमावर्ती भागातील लोकांना राजधानी पाटणाशी थेट जोडणी प्रदान करणारी, शिवाय प्रवाशांना सोयीस्कर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देईल. ही ट्रेन प्रवाशांसाठी हलक्या, पॅडेड सीट्स, ऑटोमॅटिक दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टक्करविरोधी चिलखत प्रणाली यासारख्या आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
ज्या सीमावर्ती भागात वर्षानुवर्षं विकास फक्त भाषणांमध्येच दिसला, तिथून आता राजधानी पाटणापर्यंतचा प्रवास मोदी सरकारच्या इच्छाशक्तीमुळे केवळ काही तासांत होणार आहे.
जयनगरसारख्या दूरवरच्या सीमावर्ती जिल्ह्यातून पाटणाशी थेट जोडणी देणारी १६० किमी प्रतितास वेगाने धावणारी ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन आता प्रत्यक्षात धावणार आहे. ही ट्रेन फक्त वेगाने धावणार नाही, तर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी काय काय?
नमो भारत ट्रेनमध्ये महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एका खास कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र कोचची सोय ही केवळ सोयीसाठी नाही, तर सुरक्षिततेची खात्री आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.
ही ट्रेन रस्त्यांवरील वाहतूक कमी करेल, प्रदूषण आणि अपघात टाळेल, त्यामुळे ती हरित आणि शाश्वत वाहतूक प्रणाली ठरणार आहे. ‘नमो भारत’ ट्रेन मिथिला आणि समस्तीपूरसारख्या भागांतील जनतेसाठी अभिमान, कनेक्टिव्हिटी आणि प्रगतीचं प्रतीक आहे. या ट्रेनमुळे स्थानिकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक संधींचा नवा अध्याय खुला होईल. मोदी सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…